फेरोसिमेंट सोसायटीतर्फे जलसंपदा सचिव मुंढे यांचा सत्कार

(फोटो- डावीकडून- इंजी. रमेश कुलकर्णी, ए.जी. जोशी, इंजी. एम.एस.मुंढे)

 

पुणे दि. ८ जाने. २०११– अखिल भारतीय स्तरावरील फेरोसिमेंट सोसायटी या स्थापत्य तंत्रज्ञांच्या सोसायटी तर्फे जलसंपदा सचिव इंजी. एम. एस. मुंढे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. नाशिक येथे मेरी या संस्थेत ३ वर्षापूर्वी मुंढे यांनी या विषयाची २ दिवसीय परिषद भरवली होती. त्यानंतर भारतातील अनेक तंत्रज्ञ एकत्र येऊन या सोसायटीची स्थापना झाली व इंजी. मुंढे या सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते.

फेरोसिमेंट सोसायटी चे उपाध्यक्ष इंजी. राजेंद्र पवार यांनी सोसायटीची वेगवान वाटचाल कशी सुरु आहे त्याचा आढावा सांगितला. येत्या मी महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.इंजी. मुंढे यांचा परीचय करून देताना इंजी.

चंद्रमोहन हंगेकर यांनी सांगितले की शासनाचे सचिव यासारख्या अत्यंत व्यस्त पदावर असताना सुद्धा इंजी. मुंढे ‘सी ++’ किंवा ‘आनंदी जीवनाचे रहस्य’, अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग स्वतः घेत असत हि विशेष बाब आहे.

इंजी. मुंढे हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक आहेत. अनेक धर्मांच्या ग्रंथांचा अभ्यास ते सातत्याने करत असतात. इंजी. मुंढे यांनी आपल्या भाषणात आदिवासी शाळांमध्ये शैक्षणिक मदत करण्याची तसेच स्वामीजींच्या विचारांवर व्याख्याने देण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले. फेरोसिमेंट सोसायटी च्या ३ वर्षातील प्रगती बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. फेरोसिमेंट चा वापर शासनाच्या विविध बांधकाम खात्यांनी जरूर करावा यासाठी जरूर ते मार्गदर्शन करण्याची त्यांनी तयारी दाखवली. कार्यक्रमास फेरोसिमेंट सोसायटी चे उपाध्यक्ष प्रा. ए. जी. जोशी, फेरोसिमेंट सोसायटीचे सचिव रमेश कुलकर्णी तसेच इंजी. पुरी, इंजी. राजपूत, इंजी. रवी रानडे, इंजी. वांकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.